Friday, April 24, 2009
Wednesday, September 5, 2007
मी...शोधते काही बकरे!
आधीच्या पोस्टमध्ये मी लिहीलेलं ओळख न देणाऱ्या देसींबद्दल ते काही पूर्णसत्य नाही. एका सद्कुटुंबाबद्दल तर मी विसरूनच गेले होते. निवांतवृत्तीने मी एकदा वॉलमार्टातून खरेदी करत असताना, हे देसी कुटुंब स्वत:हून माझ्यापुढे येवून थांबलं, आणि गप्पा मारायला लागलं. मला कोण आनंद झाला होता. :-) मी "अमक्याची तमकी" का? अशा प्रश्नाने गृहस्थांनी सुरुवात केली. मी "नाही" म्हटले, पण त्यामुळे काही फ़रक पडला नाही, आणि आम्ही पुढे ओळख वाढवायच्या गप्पा सुरु ठेवल्या. त्या ओळख निघण्याचा ’रॉंग-नंबर’ निघाल्यानंतरही हे कुटुंब प्रेमाने पुढे बोलत राहिल्याने, आणि त्यांनी मला ’कट’ न मारल्याने मला फ़ार बरं वाटलं होतं!
मग यथासांग फोन नंबर आणि इ-मेल ऍड्रेसेस चे आदानप्रदान करून आम्ही निरोप घेतले. दुसऱ्या दिवशी त्यांचा स्वत:हून मला फोन आणि इ-मेल ही आले! मला त्यांची आत्मियता पाहून फ़ार भरून आलं होतं. (तसं त्यांनी मला बोलावण्या ऐवजी "आम्ही येतो" असं म्हणणं वेगळं वाटलेलं, पण ते आश्चर्य मी लगेच झटकून टाकलं.) ते कुटुंब आल्यावर कसं स्वागत करायचं याचे बेत सुरु केले. ठरल्या वेळेच्या आधीपासून मी वाट पाहिलेली, आणि कांदा-पोहे; आलं घातलेला चहा (हे काही फ़ार नाही, तरी) मनापासून केलेलं. ते आले, गप्पा झाल्या. मला नवे मित्र-मैत्रीण मिळाल्याचा फ़ार आनंद झाला होता. मग त्याने एम.बी.ए. केल्यावर इथे मान्यवर कंपनीत नोकरी करता-करता कसा स्वत:चा बिझनेस सुरु केलाये हे सांगितलं. इथे असे सुमारे १५० देसी सोबत मिळून हा इ-कॉमर्स चा बिझनेस करत आहेत, आणि यातले सगळे आय.आय.टी., आय.आय.एम. अशा मान्यवर संस्थेतून उच्च शिक्षण घेतलेले आहेत, हे कळलं.
मला लय भारी वाटत होतं. अमेरिकेत येवून शिकून, नोकरी करून, मग स्वत:चा बिझनेस सुरू करून करोडपती झालेल्या देसींच्या सुरस आणि चमत्कारिक कथा मी ऐकलेल्या, वाचलेल्या होत्या. अशाच भारलेल्या १५० जणांच्या ग्रूपच्या एकाशी मी प्रत्यक्षात बोलत होते! आपल्यालाही किती काही यांच्याकडून शिकायला मिळेल या स्वप्नांत मी लगेच रमले. आश्चर्याची गोष्ट अशी, की त्यांनी लगेच मला १५१ वी पार्टनर बनण्याची ऑफ़र दिली, आणि एका मीटिंगलाही बोलावलं. :-)
हरखून जाणं काय असतं ते मी अनुभवत होते.
मीटिंगमध्ये त्या कंपनीचा प्रमुख प्रेझेंटेशन देणार होता. मी माझा एकुलता एक अती-फ़ॉर्मल ड्रेस धुवून इस्त्री करून घालून तयार झाले. आम्ही सोबत तिथे गेलो. एका देसी च्या फ़्लॅट मध्ये अनेक देसी जमून एकमेकांशी अतिशय आदबीने बोलत उभे होते. मग प्रेझेंटेशन सुरु झालं. प्रमुखाने बिझनेस म्हणजे काय, तो कसा करावा, त्यातले प्रमुख धोके काय, अशी छान सुरुवात केली. माझ्यासारख्या निर्बुद्धला असं बेसिकपासून समजावून सांगणारे फ़ार आवडतात. मी लक्षपूर्वक ऐकत होते. मग त्याने बिल गेट्स श्रीमंत कसा झाला, आपण कसे आणि का व्हावे हे खुसखुशीत उदाहरणांसह सांगितले. विनोद बरे होते. पण नर्म विनोदांनाही मागच्या रांगेतून खूप (तरीही आदरयुक्त) हशा आणि टाळ्या मिळत होत्या. (मला पुढे बसवण्यात आले होते.) आम्ही पुढचे २०/२५ जण मात्र माफ़क हसत होतो. मग प्रमुखाने इ-कॉमर्स म्हणजे काय, आणि २०० डॉलर्स च्या भांडवलानेही हा व्यवसाय कसा सुरु करता येतो हे सांगायला सुरुवात केली. आता आम्ही पुढचे सरसावून बसलो. (मागून वाहवा चालूच.) २ स्लाईड्स नंतर प्रमुख मुद्द्यावर आले. आणि एक ई-बे, ऍमॅझॉन सारखे ऑनलाईन-शॉपिंगचे पोर्टल आहे, त्याचा टेक्निकल पार्ट करून तयार आहे, मॅनेजमेण्ट इन-प्लेस आहे. पण या पोर्टल ला जाहिरातीवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत, म्हणून त्यांनी ह्या (आणि अशा अनेक) १५० बिझनेसमन्स (आणि वूमेन्स) ना काम सोपवलं आहे, प्रत्येकाने १० नवीन बिझनेसमन / वूमेन मिळवायचे, मग त्या १० नी पुढचे १००. आता ह्या सर्व मेंबर्सनी त्या वेबसाईट वरून जेवढे जमेल तेव्हढे शॉपिंग करायचे, म्हणजे त्यांचे बोनस पॉईंट वाढतील. आणि मग तुम्ही सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम मेंबर होत जाल.
ह्या स्लाईड नंतर माझा मूडच गेला. सिनेमातली हिरॉईन जशी कुंकू पुसून टाकते, तसं मला लिपस्टिक पुसून, इन केलेला शर्ट उपसून, अंगावरच्या कपड्यांना चुरगळून त्यांची इस्त्री घालवायची तीव्र इच्छा झाली. प्रेझेण्टेशन झाल्यावर सर्व प्लॅटिनम मेंबर्स चा सत्कार झाला. त्यात मला भेटलेले सद्कुटुंबही होते. शेवटी एक डी.व्ही.डी. दाखवण्यात आली, ज्यात ह्या बिझनेसच्या मर्गाने श्रीमंत झालेल्या एका देसी कुटुंबाचा आलीशान महाल आणि गाड्या आतून-बाहेरून दाखवण्यात आल्या. ते पाहून आम्हीही प्रेरित व्हावं असा उद्देश असल्याचं ऐकून मला भडभडून ओकारी येत होती (पण तिथे बादली ठेवलेली नव्हती, आणि उगाच दुसऱ्याच्या हॉलमधे नको म्हणून मी मोट्ठा आवंढा गिळला.) सर्व झाल्यावर इन्फ़ॉर्मल गप्पांच्या वेळी कळाले, की मागे बसलेले आधीच बिझनेस मन / वूमन होते. पुढे बसलेले २०/२५ जण नुकतेच देस सोडून इथे आलेले होते. त्यातला एकही २ महिन्यांपेक्षा इथे जुना नव्हता. आणि सर्वांना बागेत / स्टेशनवर / वॉलमार्टमधे / दुकानांत प्रेमळ देसी कुटुंबे भेटली होती! प्रेझेण्टेशन नंतर या सर्व २५ जणांचे चेहेरे मागे एकदा सांगलीतल्या एका खाटिकखान्यात पाहिल्यासारखे वटायला लागले होते. सर्व सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम बिझनेसमन एकमेकांची तारीफ़ करताना थकत नव्हते. "तुम्हाला इथे कोण घेवून आलं?" या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं, तरी "वा! डोण्ट वरी! यू आर इन सेफ़ हॅण्ड्स" असं उत्तर मिळत होतं. सर्वांच्या चेहेऱ्यावरचे भाव इतके तुपकट आणि आर्जवी होते की मी एखाद्या साधुबुवाच्या आश्रमात आले आहे असं वाटत होतं. तोच सद्भाव, तोच आदर, तीच दृढश्रद्धा.
असा बिझनेस जॉईन करण्यापेक्षा कारकूनी बरी हा माझा विचार पक्का होता. कुणाचे घरच्या अडचणींनी, किंवा कुवत कमी असल्याने, शिक्षण कमी झाले असेल, अशा व्यक्तीने अशी एजन्सी घेवून ४ पैसे कमावले, तर मी त्याचं कौतुकच करते. लोकांना भेटणे, नेटवर्क वाढवणे, आणि पैसे कमावणे हे वाईट नाही. पण भारतातून लाखो रुपयांच्या सबसिड्या मिळणाऱ्या मोठ्या संस्थांमधून शिक्षण घेतलेले हे उच्चविद्याविभूषित देसी परदेशात एकीकडे मानाची नोकरी करत असताना, फ़क्त आणखी पैसे मिळावेत म्हणून अशा एजन्स्या घेवून सेल्समन सारखं काम करतात, स्वत:ला बिझनेस मॅन, वूमन म्हणवून घेतात; आणि वॉलमार्टमध्ये नवख्या दिसणाऱ्या देसीना पकडून बकरे बनवतात, ह्या विचारांनी भणभणायला झालं.
माझे परममित्र सद्कुटुंब आता मला घरी सोडवायला येणार, तर मी हसून "नको, मी जाते" असं म्हटलं. समक्ष, किंवा फोनवर "नाही" म्हणायचा सडेतोडपणा अजून माझ्यात आलेला नसल्याने, मी नम्रपणे इ-मेल ने सद्कुटुंबाला कळवलं, "मी आयुष्यात कधी बिझनेस केला, तर त्यातून माझ्या अपेक्षा असतील की, (१) बिझनेस करताना त्या ह्यूज चॅलेंजला सामोरं जाण्याची एक्साईटमेण्ट, (२) माझ्या शिक्षणाचा आणि कमावलेल्या स्किल्सचा लागणारा कस (३) माझ्या आल्मामेटर (शिक्षण-संस्था) ची गर्वाने मान उंच होणे (४) आणि थोडे पैसेही मिळणे (अगदीच आतबट्याचा व्यवहार व्हायल नको, इतपत). तुमच्या इ-कॉमर्स च्या बिझनेस मधे यातले पहिले ३ फ़ायदे नसल्याने मी तो करू शकणार नाही, मला कृपया क्षमा करावी." इ-मेलच्या उत्तरात सद्कुटुंबाने कधी इ-मेल किंवा फोनही केला नाही.
त्यांनी लगेच गाडीने वॉलमार्ट गाठले असावे!
मी मात्र इ-मेल पाठवल्यावर मोट्ठा सुस्कारा सोडला... मनात आलं, मी जर हा बिझनेस जॉईन केला असता, आणि ह्याचे डिटेल्स कळवले असते, तर माझ्या तिशीला झुकलेल्या वयाची, किंवा आजूबाजूच्या लोकांची तमा न बाळगता, वालचंदच्या कॉम्प्युटर डिपार्टमेण्टच्या आमच्या देसाई बाईंनी माझ्या कानफ़टाखाली ज्जाळ काढला असता!

Subscribe to:
Posts (Atom)